पालिका कार्यालयांत तंबाखू बंदी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 June 2014

पालिका कार्यालयांत तंबाखू बंदी

मुंबई - महानगरपालिकेची सर्व कार्यालये, रुग्णालये आणि दवाखान्यांत आता तंबाखू, गुटख्याच्या पुड्या घेऊन जाण्यास बंदी घालण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव आरोग्य समितीपुढे सादर करण्यात आला आहे. 
पालिकेच्या कार्यालयांमध्ये तंबाखुजन्य पदार्थ खाऊन येण्यास; तसेच खाण्यास बंदी आहे. कार्यालयांच्या इमारतींमध्ये प्रवेश करताना लाल तोंड दिसल्यास सुरक्षा रक्षक संबंधित व्यक्तींना हटकतात; मात्र खिसे तपासले जात नसल्याने तंबाखू, गुटख्याच्या पुड्या घेऊन जाऊन असे पदार्थ आतमध्ये खाल्ले जातात. पालिका रुग्णालयांमध्येही अशीच परिस्थिती आहे. नायर, केईएम आणि शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात पिचकाऱ्या मारणाऱ्यांवर वचक ठेवण्यात आला आहे; मात्र उपनगरातील लहान-मोठी रुग्णालये; तसेच दवाखान्यांत तंबाखू व गुटख्याचे सेवन केले जाते. यातून अधिक संसर्ग होतो. यावर उपाय म्हणून तंबाखूजन्य पदार्थ पालिकेच्या इमारतींत घेऊन जाण्यावर बंदी घालण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

तंबाखूजन्य पदार्थ आणि कर्करोग - मुंबईत तोंडाच्या कर्करोगाचे 40 टक्के रुग्ण. 
- त्यातील 75 टक्के रुग्णांना तंबाखूजन्य पदार्थ खाण्याची सवय. 
- दर वर्षी 30 हजार रुग्णांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे निदान. 
- दोन पुरुषांमागे एका स्त्रीला तोंडाचा कर्करोग. 
- 40 वर्षांवरील पुरुषांचे प्रमाण अधिक.

Post Bottom Ad

JPN NEWS