मुंबई : दूरदर्शनच्या कंत्राटी कामकारांना कायमस्वरूपी करण्याबाबत सकारात्मक विचार करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी भारतीय पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाला दिले. दूरदर्शनमध्ये वृत्तसंकलन, तंत्रज्ञ आणि इतर विभागात गेली दहा ते बारा वर्ष कंत्राटी स्वरूपात मोठय़ा प्रमाणावर कर्मचारी कार्यरत आहेत. कामगार कायद्याच्या संरक्षणापासून हे कंत्राटी कर्मचारी वंचित आहेत. अनेक वर्ष काम करूनही त्यांना कायमस्वरूपी केले जात नाही. कुठल्याही क्षणी कामावरून कमी करता येते. त्यामुळे या कंत्राटी कर्मचार्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष अण्णासाहेब देसाई, सरचिटणीस अशोक शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतीच जावडेकर यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
Post Top Ad
25 June 2014
Home
Unlabelled
कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर विचार करणार
कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर विचार करणार
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

