विमानांच्या संचलनात अडथळा ठरणारे जाहिरात फलक हटवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विमानांच्या संचलनात अडथळा ठरणारे जाहिरात फलक हटवले

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comविमानांच्या उड्डाणात अडथळा ठरणारे ११ जाहिरात फलक महापालिकेने युद्धपातळीवर हटवले आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) आणि मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लिमिटेड (मियाल) यांनी विमानतळाच्या धावपट्टीच्या कक्षेत येणार्‍या जाहिरात फलकांची यादी देऊन या फलकांमुळे विमानांच्या उड्डाणासाठी अडथळा येत असल्याने या फलकांची उंची कमी करण्याची मागणी पालिकेकडे केली होती. 
हे फलक उभारणार्‍या जाहिरातदारांकडे फलक लावण्यासाठी 'मियाल'चे ना हरकत प्रमाणपत्रही नव्हते. यामुळे या जाहिरातदारांना चार महिन्यांपूर्वी जाहिरात फलकांची उंची कमी करणे तसेच 'मियाल'कडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे, अशा सूचना दिल्या होत्या, पण तरीही जाहिरातदारांनी काहीच कार्यवाही केली नाही. पालिकेचे उपायुक्त (विशेष) राजेंद्र वळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने विमान प्राधिकरणाचे आणि पालिकेच्या परवाना विभागाचे अधिकारी व जाहिरातदार यांची संयुक्तिक बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी तातडीने तीन दिवसांची आगाऊ नोटीस देऊन जाहिरात फलक काढण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर पालिकेने युद्धपातळीवर अहोरात्र काम करून ११ जाहिरात फलक हटवले आहेत. अनुज्ञापन अधीक्षक शरद बांडे, उपअधीक्षक शहाबुद्दीन शेख, सहाय्यक अधीक्षक दामोदर हेगडे, प्रकाश जाधव, एस.पी. बनसोडे व जी.व्ही. पाटील तसेच वाकोला पोलीस ठाण्याचे अधिकारी, वाहतूक पोलिसांनी या कारवाईत भाग घेतला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages