भरती दरम्यान नागरिकांनी समुद्राजवळ जाऊ नये - महापौर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भरती दरम्यान नागरिकांनी समुद्राजवळ जाऊ नये - महापौर

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comभरती दरम्यान समुद्राजवळ जाऊन समुद्राच्या लाटांची मजा लुटत असताना सख्खे भाऊ असणारे दोन युवक आज भरतीच्या दरम्यान समुद्रात ओढले गेले होते, त्यापैकी एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दुसऱ्यास मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून वाचवले. अशा दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, भरती असताना समुद्राजवळ जाऊ नये व दुरूनच भरतीची मजा लुटावी, असे आवाहन मुंबईचे महापौर सुनिल प्रभु यांनी (दिनांक १५ जून २०१४) केले आहे. तसेच अशा दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी बृहन्मुंबई महानगर पालिका सर्वतोपरी प्रयत्न करत असून नागरिकांनी देखील आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी व महापालिकेद्वारे दिल्या जाणाऱ्या सर्व सूचनांचे पालन करून महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन देखील महापौरांनी केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages