मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) पावसाळ्यात पाणी साचल्याने मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा कोलमडते. यंदा प्रवाशांना हा त्रास होणार नाही, असे मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले. रुळांवर "मल्टिसेक्शन डिजिटल ऍक्सल काऊंटर‘ लावण्यात आल्याने ही समस्या यंदा निर्माण होणार नाही, असे ते म्हणाले.
या पद्धतीत रुळावरून किती ऍक्सल गेले याची नोंद घेतली जाईल व त्यामुळे पुढील सिग्नल ठरेल. यापूर्वीच्या पद्धतीत रुळांवर पाणी साचल्यानंतर संबंधित यंत्रणा कोलमडत असे. सिग्नल यंत्रणा विस्कळित होत असे. रुळांवर पाणी साचण्याच्या ठिकाणांजवळ हे काऊंटर लावण्यात आले आहेत. यामुळे येत्या पावसाळ्यात मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा कोलमडणार नाही, असा विश्वास मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला. चुनाभट्टी, शीव, परळ, घाटकोपर, भांडुप, विक्रोळी, कांजूरमार्ग, मुलुंड, ठाणे, मुंब्रा, कळवा, कल्याण या पावसाळ्यात नेहमी पाणी साचणाऱ्या स्थानकांजवळ "मल्टिसेक्शन डिजिटल ऍक्सल काऊंटर‘ लावण्यात आले आहेत, अशी माहिती पाटील यांनी दिली.