मेल-एक्स्प्रेसची तिकिटे एटीव्हीएममधून - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मेल-एक्स्प्रेसची तिकिटे एटीव्हीएममधून

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) लांब पल्ल्याच्या गाड्यांची अनारक्षित तिकिटे काढण्यासाठी प्रवाशांना तिकीट खिडक्यांवर गर्दीमध्ये उभे राहावे लागू नये म्हणून रेल्वे प्रशासनाने मेल-एक्स्प्रेसची अनारक्षित तिकिटे एटीव्हीएमवरच उपलब्ध करून दिली आहेत. सीएसटी, दादर, ठाणे, कल्याण, कर्जत आणि कसारा या सहा महत्त्वाच्या स्थानकांवरील एटीव्हीएम मशीन्सद्वारे ही सुविधा प्रवाशांना देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कार्डवरून दिल्ली, बंगळुरू, कोलकाता अशा कोणत्याही प्रवासासाठी तिकिटे काढता येऊ शकतात. 


सीव्हीएम कूपन्सला पर्याय म्हणून एटीव्हीएम मशीन्स रेल्वे प्रशासनाने आणली आहेत. ही एटीव्हीएम मशीन्स प्रवाशांमध्ये अधिक लोकप्रिय करण्यासाठी मध्य रेल्वेने या एटीव्हीएम मशीन्सवर लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांची अनारक्षित तिकिटे देण्यास सुरुवात केली आहे. सीएसटी, दादर, ठाणे, कल्याण, कर्जत आणि कसारा या सहा महत्त्वाच्या स्थानकांवरील एटीव्हीएम मशीन्समधून बाहेरगावी जाणार्‍या गाड्यांची अनारक्षित तिकिटे काढता येणार आहेत. तसेच १५0 किलोमीटरच्या आत असलेल्या प्रवासासाठी रेल्वेतर्फे एटीव्हीएमवर क ाढलेल्या प्रत्येक तिकिटावर ५ टक्के सूट देण्यात येणार आहे. मात्र त्यापुढील अंतरासाठी तिकिटाएवढेच शुल्क आकारले जाणार आहे. भुसावळ, नाशिक, पुणे, दिल्ली अशा कोणत्याही स्थानकापर्यंत हे अनारक्षित तिकीट काढता येणार आहे. ही सेवा मध्य रेल्वेच्या या सहा स्थानकांवर सुरू झालेली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages