बेस्ट डेपोंमध्ये पार्किंगची सुविधा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 June 2014

बेस्ट डेपोंमध्ये पार्किंगची सुविधा

मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) बेस्टची आर्थिक तूट कमी करण्यासाठी बेस्टने आपल्या बस डेपोमध्ये वाहनतळ (पार्किंग) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतील पार्किंगचा प्रश्न मार्गी लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बेस्ट समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. त्याला समितीची अंतिम मंजुरी मिळाली की पार्किंग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 
बेस्ट डेपोमधील बस दिवसभर रस्त्यावर असल्यामुळे डेपोमधील जागा मोकळी असते. त्यामुळे याचा वापर पार्किंगासाठी करून त्यातून बेस्टचा महसूल वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यानुसार, दर निश्‍चित करण्यात आले आहेत. डेपोमध्ये प्रति दिन १२ तास अवजड वाहन उभे करण्यासाठी २00 रुपये, कार-जीप व इतर अन्य हलक्या वाहनांसाठी १५0 रुपये तर मोटारसायकलसाठी ७५ रुपये आकारण्यात येणार आहेत. क ॉण्ट्रॅक्टरने एका डेपोमध्ये किमान २0 दुचाकी, १0 चारचाकी आणि ५ अवजड वाहने उभी करण्याची परवानगी मागितली आहे. पार्किंग देताना कॉण्ट्रक्टरकडून आनमत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून घेण्यात येणार आहे. त्यांच्या क ॉण्ट्रक्ट कालावधीत बेस्टच्या मालमत्तेचे नुकसान न झाल्यास ही अनामत रक्कम बिनव्याजी परत करण्यात येणार आहे. 

बस डेपोमध्ये ज्या वाहनचालकांना आपली गाडी उभी करायची असेल त्यांच्या गाड्यांची सुरक्षा तपासणी करण्यात येणार आहे. ठरवून दिलेल्या रस्त्याने वाहनचालकांना डेपोमध्ये प्रवेश मिळणार आहे. जर एखाद्या वाहनामध्ये बिघाड झाला तर त्या वाहनांची डेपोमध्ये दुरु स्ती होणार नाही. पार्किंग नाकारण्याचा अधिकार बेस्टने आपल्याकडे राखून ठेवला आहे.
(दररोज १२ तास)    वाहनांचाप्रकार           मासिक 
            अवजड वाहने    २00 रुपये  ५ हजार रुपये

            हलकी वाहने     १५0 रुपये  ४ हजार रुपये
            दुचाकी वाहने     ७५ रुपये  २ हजार रुपये
JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS