पालिका शाळांमध्ये म्हाडातर्फे बायो टॉयलेट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका शाळांमध्ये म्हाडातर्फे बायो टॉयलेट

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या झोपडपट्टी सुधार मंडळातर्फे झोपडपट्टय़ांमध्ये राबविण्यात येणार्‍या उपयुक्त उपक्रमानंतर आता मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये पर्यावरणपूरक असे बायो टॉयलेट बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 
म्हाडाच्या झोपडपट्टी सुधार मंडळातर्फे अनेक वस्त्यांमध्ये शौचालये बांधण्यात येतात. त्याचबरोबर काही ठिकाणी लोकांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक समाजकल्याण केंद्रेही म्हाडाने उभारली आहेत. अनेक बचत गटांतील महिलांच्या माध्यमातूनही स्वच्छ आणि घरगुती स्वरूपाच्या स्वयंपाक घरांची संकल्पना राबवण्याचे झोपडपट्टी सुधार मंडळाकडून प्रस्तावित आहे. त्यानंतर आता झोपडपट्टी सुधार मंडळाने मुंबई महानगरपालिकेतील मुलांच्या स्वच्छतेसाठी पर्यावरणपूरक असे बायो टॉयलेट उपलब्ध करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

या शौचालयांची रचना वेगळय़ा पद्धतीने असून तयार होणारा गॅस हा दुर्गंधीमुक्त असणार असल्याचे अभियंत्यांकडून सांगण्यात आले आहे. तर येथील मलनिस्सारण पाण्यावर प्रक्रिया होऊन हे पाणी बाग बगीच्यामध्ये पुनर्वापर करता येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. यासाठी ५.७५ लाख रुपये खर्च असून पर्यावरणपूरक उपक्रमामुळे चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages