निवडणुकीमध्ये भाडेवाढीचा फटका बसण्याच्या भीती
मुंबई - रेल्वे भाडेवाढीचा फटका विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता निर्माण झाल्याने ही भाडेवाढ रद्द करावी अशी मागणी महाराष्ट्र भाजपने केली आहे.महाराष्ट्राती पक्ष नेत्यांनी याबाबत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त आहे.
रेल्वेभाडेवाढीचा सर्वाधिक फटका मुंबईकरांना बसणार असून लोकल ट्रेनच्या मासिक पासमध्ये दुप्पटीने वाढ होणार आहे. राज्यात येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक होणार असून भाडेवाढीचा फटका निवडणुकीत बसू शकतो अशी भितीही निर्माण झाली होती. यानंतर भाजपच्या राज्यातील नेत्यांनी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली आहे. या चर्चेत राज्यातील भाडेवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. राजनाथ सिंह यांनी याबाबत पंतप्रधान व रेल्वेमंत्र्यांशी चर्चा करु असे आश्वासन भाजप नेत्यांना दिले आहे. त्यामुळे याबाबत लवकरच सकारात्मक तोडगा निघेल अशी आशा व्यक्त होत आहे.
