महिलांच्या डब्यातील दरवाजे होणार बंद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महिलांच्या डब्यातील दरवाजे होणार बंद

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comरेल्वेत महिलांचा प्रवास निर्धोक आणि सुरक्षित होण्यासाठी दोन लोकलमधील महिलांच्या डब्यांमध्ये बंद दरवाजाची संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक स्तरावर या प्रयोगाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. लोकलमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पुढील पाऊल टाकण्यात येणार आहे.
रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अरुणेंद्र कुमार सध्या मुंबई दौर्‍यावर आहेत. या काळात त्यांनी रेल्वेशी संबंधित सर्व समस्या जाणून घेतल्या. रेल्वे बोर्ड अध्यक्ष अरुणेंद्र कुमार यांनी सोमवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. या बैठकीत लोकल सेवा, एसी लोकल, स्वच्छतागृहे आदी विविध प्रश्नांवर चर्चा झाली. महिलांच्या सुरक्षित प्रवासास प्राधान्य देत अरुणेंद्र कुमार यांनी दोन गाड्यांमधील महिलांच्या डब्यांत दरवाजे बंद करण्याची योजना आखली जाणार असल्याचे या वेळी स्पष्ट केले. प्रायोगिक तत्त्वावर दरवाजे बंद संकल्पना राबवली जाणार आहे. गेल्या काही महिन्यांत एकट्यादुकट्या महिला प्रवाशांवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

रेल्वेतील स्वच्छतागृहे कमालीची अस्वच्छ आणि घाणेरडी असतात. महिला प्रवाशांची यामुळे सर्वाधिक कुचंबणा होत आहे. आगामी काळात रेल्वे स्टेशनवर नवी स्वच्छतागृहे सुरू करण्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भर दिला. तसेच उभारल्यानंतर या स्वच्छतागृहांचा दर्जा उत्तम ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली.


Post Bottom Ad

JPN NEWS

Pages