घर हक्क आंदोलनात पालिका कामगार सहभागी होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

घर हक्क आंदोलनात पालिका कामगार सहभागी होणार

Share This
मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comघर हक्क आंदोलनाच्या मोर्चात मुंबई महानगरपालिकेचे कामगार सहभागी होणार आहे. ४ जून रोजी विधान भवनावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. सफाई कामगारांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेतंर्गत मोफत घर विनाविलंब देण्यात यावीत तसेच सर्व महापालिका कामगारांना आणि श्रमिकांना परवडणार्‍या दरातील घरे देण्यात यावी, यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये पालिकेतील सर्व कर्मचार्‍यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सफाई मजदूर संघाचे सरचिटणीस उत्तम गाडे यांनी केले आहे. 

राज्य शासनाने २२ ऑक्टोबर २00८ रोजी जीआर काढून महानगरपालिका, नगरपालिकांमध्ये २५ किंवा त्यापेक्षा अधिक काळ सफाईचे काम करणार्‍या कामगारांना किंवा त्यांच्या वारसांना घरे देण्याचे आश्‍वासन जाहीर केले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजनेच्या माध्यमातून ही घरे देण्यात येणार होती, मात्र या जीआरची अद्यापही अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे घर हक्क आंदोलनाच्या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे सफाई मजदूर संघाचे सरचिटणीस उत्तम गाडे यांनी प्रसिद्धीपत्रकातून सांगितले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages