खेरवाडी उड्डाणपुलाची दक्षिण मार्गिका - पांजरपोळ-घाटकोपर जोडरस्ता पूर्ण - सोमवारी उद््घाटन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

खेरवाडी उड्डाणपुलाची दक्षिण मार्गिका - पांजरपोळ-घाटकोपर जोडरस्ता पूर्ण - सोमवारी उद््घाटन

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comखेरवाडी उड्डाणपुलाची दक्षिण मार्गिका आणि पूर्व मुक्त मार्गावरील पांजरपोळ-घाटकोपर जोडरस्ता मान्सून येण्याअगोदरच बांधून पूर्ण झाला आहे. यामुळे वरळीच्या दिशेने जाताना खेरवाडी जंक्शन परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे, तर पांजरपोळ-घाटकोपर जोडरस्ता पूर्ण झाल्यामुळे पूर्व मुक्त मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला झाला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी अनुक्रमे दुपारी ३ आणि ३.३0 वाजता उड्डाणपुलाची मार्गिका आणि जोडरस्त्याचे उद््घाटन होणार आहे.
पश्‍चिम द्रुतगती महामार्गावरून वरळीच्या दिशेने जाताना कलानगरच्या अगोदर खेरवाडी जंक्शन येथे मोठय़ा प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत असे. वांद्रे-कुर्ला संकुलात जाण्यासाठी सरकारी वसाहतीमधून कमी वेळात जाण्याचा मार्ग उपलब्ध झाला होता. त्यामुळे बहुतांश चालक कलानगरपेक्षा खेरवाडी जंक्शनहून वांद्रे-कुर्ला संकुल येथे जाण्यास पसंती देत होते. तसेच या परिसरात अनेक सरकारी कार्यालये, शैक्षणिक संस्था असल्यामुळे नेहमीच वर्दळ होत असे. त्यामुळे एमएमआरडीएने खेरवाडी जंक्शन येथे उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार नोव्हेंबर २0१३ रोजी खेरवाडी पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे जे. कुमार कंपनीला कंत्राट देण्यात आले असून २१ कोटी ९६ लाख रुपये खर्च आल्याचे समजते.

पूर्व मुक्त मार्गावरील २.८0 किमी लांबीच्या पांजरपोळ-घाटकोपर जोडरस्त्याचे काम रखडले होते. मात्र पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वीच उर्वरित कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे आता १६.४ किमी लांबीचा पूर्व मुक्त मार्ग पूर्णपणे खुला होणार आहे. वाहनचालक दादर, सायन, चेंबूर, कुर्ला आणि मानखुर्द येथे होणारी वाहतूक कोंडी टाळून पुढे मार्गक्रमण करू शकतात.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages