मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये संघर्षाचे कारण ठरलेले कॅनेडियन वेळापत्रक अखेर आजपासून 12 आगारांत लागू झाले. 1 जुलैपासून बेस्टच्या सर्वच 26 आगारांमध्ये याची अंमलबजावणी होईल. सलग 12 तास काम करावे लागणार असल्याने कामगार संघटनांचा या वेळापत्रकाला विरोध होता.
बेस्ट कामगार युनियनचे शरद राव यांनी या वेळापत्रकाला कडाडून विरोध केला होता; मात्र बेस्ट व्यवस्थापन आणि कामगार नेत्यांमध्ये समझोता झाल्याने त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वेळापत्रकानुसार 12 तासांऐवजी कामाच्या वेळा प्रत्यक्ष 10 तासांवर आणल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे; मात्र वाहक आणि चालक यांनी हा दावा फेटाळून लावत प्रत्यक्ष 12 तास काम करावे लागणार असल्याची माहिती दिली. कामगार संघटना आणि बेस्ट प्रशासन यांच्यात वाटाघाटी झाल्याने नाईलाजाने हे वेळापत्रक स्वीकारावे लागत असल्याची भावना बेस्ट चालक आणि वाहकांत आहे. त्यामुळे भविष्यात या वेळापत्रकाच्या अंमलबजावणीमुळे पुन्हा संघर्ष निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.