रेल्वेची दरवाढ अयोग्यच - आठवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेल्वेची दरवाढ अयोग्यच - आठवले

Share This
पुणे : रेल्वे अर्थसंकल्पाला जेमतेम पंधरवडा उरला असताना केंद्र सरकारने त्या आधीच रेल्वे भाडेवाढीचा बॉम्ब टाकल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे कंबरडे मोडले असल्याने ही दरवाढ अयोग्यच असून, याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती खासदार रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने आठवले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच व्यासपीठावर आले होते. या वेळी पवार म्हणाले, अर्थसंकल्पाला पंधरवडा उरला असताना रेल्वे भाडेवाडीचा बॉम्ब टाकण्यात आला आहे. त्यामुळे जनता नाराज झाली आहे. या दरवाढीबाबत आठवलेसाहेब तुम्ही महायुतीच्या माध्यमातून सरकारला बाजू मांडावी आणि आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आणू नका. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले, अच्छे दिन येणार असल्याची स्वप्ने दाखविण्यात आली आहेत. रेल्वेची दरवाढ ही अन्यायकारकच आहे. या दरवाढीमुळे मोदींच्या प्रतिमेला धक्का बसणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages