मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) मुंबई महापालिकेच्या विविध विभागांतील ९४२ लिपिकांची रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाइन परीक्षा आणि टंकलेखनाची व्यावसायिक चाचणी १३, १४ आणि १५ जून रोजी घेण्यात येणार आहे. यासाठी तब्बल ७१ हजार ८१६ उमेदवार परीक्षा देणार आहेत. विशेष म्हणजे, उमेदवारांच्या सोयीसाठी ही परीक्षा एकाच वेळी राज्यातील १४ जिल्ह्यांत घेण्यात येणार आहे. परीक्षेला आवश्यक असणारी प्रवेशपत्रे ३0 मेपासून मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहेत. प्रवेशपत्र आणि ऑनलाइन परीक्षेसंदर्भात काही अडचणी आल्यास उमेदवारांनी मार्गदर्शनासाठी टोल फ्री क्र. १८00१0२२00४ यावर सकाळी १0 ते सायंकाळी सात या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. या परीक्षेसाठी सर्वाधिक उमेदवार मुंबईतून २५ हजार ७३७ असून, त्याखालोखाल औरंगाबादहून सात हजार ३३२ आणि ठाण्यातून सहा हजार ९१0 उमेदवार आहेत. सर्वात कमी प्रतिसाद सातार्याहून (८५७) आणि रत्नागिरीतून (९३२) मिळाला आहे.
Home
Unlabelled
पालिकेतील लिपिक पदासाठी ७१ हजार ८१६ अर्ज
पालिकेतील लिपिक पदासाठी ७१ हजार ८१६ अर्ज
Share This
Share This
About Anonymous
Author Details
JPN News is a trusted Marathi digital news portal operating since 2013. JPN News is registered as a news agency with the Government of India. This portal mainly focuses on important social, political, economic, cultural developments in Mumbai, suburbs and Maharashtra. Its main objective is to deliver fast, honest and local to state-level news to the people. Reliability, speed and local vibe are the hallmarks of JPN News.

