धारावीकरांच्या घरांसाठी मोदींना भेटणार-आ. बाबुराव माने - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

धारावीकरांच्या घरांसाठी मोदींना भेटणार-आ. बाबुराव माने

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comधारावतील रहिवाशांच्या ४00 चौ.फूट घरांच्या मागणीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती धारावी बचाव आंदोलनाचे नेते व माजी आ. बाबूराव माने यांनी दिली. खा. राहुल शेवाळे यांनी धारावी बचाव आंदोलकांच्या मागणीबाबत ठोस कार्यवाहीची भूमिका घेतली आहे. धारावी बचाव आंदोलनात काँग्रेस पक्षवगळता सर्वपक्षीयांचा समावेश आहे. राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असल्यामुळे हा प्रश्न सुटणे कठीण झाले आहे, मात्र आता केंद्रात भाजपाचे सरकार आल्यामुळे राज्य शासनावर दबाव निर्माण करून पुढील पाऊले उचलता येऊ शकतील. म्हाडाच्या माध्यमातून राज्य सरकारने विकासकांच्या फायद्यासाठी हा प्रकल्प सुरू केला आहे. जनतेच्या हरकती व सूचना मागवून कारवाई होणे गरजेचे आहे, मात्र तसे होत नसल्याने ४00 चौ. फूट घरांची मागणी आता उचलून धरणार असल्याचे माने म्हणाले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages