फेसबुकवरील 'तो' मजकूर ५ मिनिटांतच ब्लॉक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

फेसबुकवरील 'तो' मजकूर ५ मिनिटांतच ब्लॉक

Share This
मुंबई : फेसबुक व सोशल मीडियात महापुरुषांची बदनामी करणार्‍या मजकुरामुळे पुण्यात मोहसीन सादिक या तरुणाच्या हत्येचे प्रकरण ताजे असतानाच 'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह मजकूर अपलोड करण्यात आला होता. मात्र सावध पोलिसांनी केवळ पाच मिनिटांत हा मजकूर ब्लॉक केल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगण्यात आले. शनिवारी पोलिसांनी दाखवलेल्या या सतर्कतेमुळे राज्यभरातील मोठा अनर्थ टळल्याचा दावा पोलिसांनी केला. 
केंद्रात भाजपाचे सरकार आल्यामुळे फेसबुक व सोशल मीडियात देशातील बड्या शक्तींविरुद्ध आक्षेपार्ह व अपमानास्पद मजकूर टाकून जातीय तणाव निर्माण करण्याचा काही व्यक्ती हेतुपुरस्सर प्रयत्न करत असल्याने पोलीस गुप्तचर यंत्रणांना सावध राहावे लागणार आहे. राज्याचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज व दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर टाकल्यामुळे मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत तणावाचे वातावरण पसरले. पुण्यात संशयावरून एका मुस्लीम तरुणाची हत्या करण्यात आली. हे प्रकरण ताजे असतानाच शनिवारी डॉ. आंबेडकर यांच्याविषयी अज्ञात व्यक्तीने फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर अपलोड केला.

पहिल्या प्रकरणातील अज्ञात व्यक्तींचा शोध घेण्याचे काम पोलिसांच्या अनेक शाखा करत असताना त्यांना शनिवारी डॉ. आंबेडकरांबाबत असा मजकूर टाकल्याचे आढळून आले. 
या मजकुरामुळे मुंबईसह महाराष्ट्रात अप्रिय घटना घडल्या असत्या. हा मजकूर ब्लॉक केला व मोठा अनर्थ टाळला. एवढे करून पोलीस थांबले नाहीत तर त्यांनी फेसबुकच्या साईट मॅनेजरला तत्काळ पत्र पाठवून हा मजकूर टाकणार्‍या व्यक्तीची सविस्तर माहिती देण्यास सांगितले. पोलीस यंत्रणेच्या या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगण्यात आले

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages