मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) पोलिस भरतीच्या शारीरिक चाचणीत भरउन्हात धावताना अंबादास बबन सोनवणे (वय 23) या तरुणाचा आज (बुधवारी) मृत्यू झाला. तो मालेगाव येथून आला होता. अन्य चार जणही यात जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. विक्रोळीतील कन्नमवारनगर येथे ही घटना घडली.
मुंबई पोलिस दलातील भरतीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी विक्रोळीत सुरू आहे. त्यात पूर्व द्रुतगती महामार्गाच्या सर्विस रोडवर उमेदवारांना पाच किलोमीटर धावायला लावले जाते. बुधवारी सकाळी भरउन्हात चाचणी सुरू असताना अंबादास सोनवणे धावताना चक्कर येऊन पडला. त्याला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. संजय गिरी (वय 25), अक्षय कुंभार (29), हरी जयवंत जाबीर (22) आणि अंबादास पवार (25) हे चौघे धावताना पडल्याने जखमी झाले. त्यांना मुलुंड आणि विक्रोळीतील रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेमुळे भरतीसाठी आलेल्या उमेदवारांत खळबळ माजली.