पोस्टमॉर्टेम २४ तास होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 June 2014

पोस्टमॉर्टेम २४ तास होणार

मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comसूर्योदय ते सूर्यास्त या कालावधीतच मृताच्या पार्थिवाचे पोस्टमॉर्टेम करण्याचा ब्रिटीशकालीन कायदा बदलून आता २४ तास पोस्टमॉर्टेम करण्याचा नियम राज्याच्या वैद्यकीय शिक्षण खात्याने घेतल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळात सांगितले.
पूर्वीच्या काळी पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने अपुऱ्या उजेडात शवविच्छेदनाच्या नियमांचे काटेकोर पालन होणे अशक्य होते. मात्र, आता तंत्रज्ञान खूप पुढे गेले असून, अजूनही याच जुन्या कायद्यामुळे आधीच दुःखात बुडालेल्या मृतांच्या नातेवाईक व आप्तस्वकीयांना कारणाशिवाय या कायद्यामुळे त्रास होत होता. आपण कार्यकर्ते म्हणून काम करताना अनेकदा सूर्यास्तानंतर मृताच्या पार्थिवाचे पोस्टमॉर्टेम होत नसल्याने अनेक सामान्य नागरिकांना त्रास झाल्याचे आपण अनुभवलेले आहे. हा त्रास कमी व्हावा हाच उद्देश या निर्णयामागे असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS