मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) उपनगरीय रेल्वेने प्रवास करत असताना लोकल कधी येणार, याची अचूक माहिती आता रेल्वे प्रवाशांना मिळू शकणार आहे. वाय-फ ाय तंत्रज्ञानाच्या आधारे उपनगरीय रेल्वेच्या प्रवाशांना लोकलची माहिती मिळू शकणार आहे.
भारतीय रेल्वेमध्ये याआधी हा प्रयोग यशस्वी झाला असून आता मध्य रेल्वेमध्ये वाय-फाय तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. प्रवाशांना अगदी कमी किमतीमध्ये ही वाय-फाय सेवा पुरवण्यात येणार आहे. पिगीतर्फे ही सेवा देण्यात येणार आहे. एका मोबाईल कंपनीने उपनगरीय रेल्वेच्या प्रवाशांना वाय- फाय सेवा पुरवण्यासाठी मध्य रेल्वेला एका प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावातून महसूल कसा मिळू शकतो, याचा अभ्यास केला जाणार आहे. विमानतळावरदेखील वाय-फ ाय पुरवण्यात येते. त्याच धर्तीवर आता रेल्वे स्थानकांमध्येही वाय-फाय सेवा देण्यात येणार आहे. त्याद्वारे प्रवाशांना लोकलचे अचूक वेळापत्रक मिळण्यास मदत होणार आहे.मध्य रेल्वेच्या एका अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार वाय-फाय सेवेसाठी प्रवाशांकडून किती रक्कम आकारली जाणार, हे अजून निश्चित नसले तरी सामान्य प्रवाशांना परवडेल अशाच दरामध्ये ही सेवा देण्यात येणार आहे. तसेच या सेवेसाठी प्रवाशांनी कशा पद्धतीने रक्कम भरायची आहे, हे जरी निश्चित करण्यात आले नसले तरी डेबिट कार्ड किंवा क्रेडिट क ार्डद्वारे प्रवासी पैसे भरू शकणार आहेत. तसेच प्रवाशांना थ्री जीची सेवाही देण्यात येणार आहे