मुंबई - मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवासाच्या मासिक पासच्या भाड्यात दुपटीहून अधिक वाढ करण्यात आली आहे. सध्या 15 सिंगल तिकिटांच्या किमतीएवढा असलेल्या मासिक पासची किंमत 30 सिंगल तिकिटाच्या किमतीएवढी करण्यात आली आहे. प्रथम श्रेणीच्या मासिक पासची किंमत द्वितीय श्रेणीच्या मासिक पासच्या किमतीच्या जवळजवळ चौपट असेल. तीन महिन्यांचा पास, अर्धवार्षिक पास आणि वार्षिक पासच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.
नवीन दराचे तिकीट छापून मिळेपर्यंत सध्या असलेल्या तिकिटांवर नवीन दराप्रमाणे आकारणी केली जाईल. 25 जूननंतर प्रवास करण्यासाठी आरक्षित केलेल्या तिकिटांसाठी नवीन दराने फरकाची रक्कम आकारली जाईल. रेल्वेच्या किमान अंतराचे भाडे वाढलेले नाही, ही यामधील एकमेव दिलासा देणारी बाब आहे. आरक्षण आणि सुपरफास्ट शुल्कामध्ये कोणतीही वाढ केलेली नाही.
भाडेवाढीनंतरचे नवीन दर
चर्चगेटपासूनचे दर-- द्वितीय श्रेणी-- प्रथम श्रेणी--द्वितीय श्रेणी पास --प्रथम श्रेणी पास -- मुंबई सेंट्रल-- 5-- -------50------------150----------625
दादर----------10-----70-------330-----685---
वांद्रे----------10------70-----330-----685---
अंधेरी--------15-------105-----480-----1310---
बोरिवली------15-----135----480-----1310---
भाईंदर--------15-----145-----480-----1930---
वसई रोड----20----160-------645----1960---
विरार--------20----165-----645----1960
मुंबई ते दिल्ली राजधानी एक्स्प्रेस-- 3 एसी दर 2030, 2 एसी 2810 व 1 एसी 4680
मुंबई ते दिल्ली मेल एक्स्प्रेस-- शयनयान-595, 3 एसी-1550, 2 एसी- 2245, 3 एसी- 3850
मुंबई ते अहमदाबाद- शयनयान-315, एसी चेअर कार-655, 3 एसी- 805, 2 एसी -1135, 1 एसी-1915
मुंबई ते अहमदाबाद- एसी चेअर कार-960, 1 एसी-1870
मुंबई ते दिल्ली शयनयान श्रेणीच्या प्रवासासाठी सध्या 555 रुपये मोजावे लागत असत. आता त्यासाठी 632 रुपये द्यावे लागतील.
भाडेवाढीवर प्रतिक्रिया प्रवासी महासंघाचा भाडेवाढीला तीव्र विरोध आहे. भाडेवाढ करण्यापूर्वी प्रवाशांना पुरेशा सोई आणि सुविधा देणे आवश्यक आहे; मात्र रेल्वेने त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे, ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. काही वर्षांत रेल्वेने केलेली ही मोठी भाडेवाढ आहे. वाढत्या महागाईच्या दिवसांत या भाडेवाढीमुळे नागरिकांचे बजेट कोलमडण्याची भीती आहे.
- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संघ
भाडेवाढीच्या तुलनेत सुविधा मात्र दिल्या जात नाहीत. फलाटाची उंची वाढवण्याबाबत रेल्वे प्रशासन उदासीन आहे. रेल्वेला केवळ पैसे महत्त्वाचे वाटतात. रेल्वेला प्रवाशांच्या सुरक्षेची अजिबात काळजी नाही. भारतीय रेल्वेच्या सुमारे सव्वाकोटी प्रवाशांपैकी सुमारे निम्मे प्रवासी मुंबईत आहेत. त्या प्रमाणात रेल्वेला मुंबईतून महसूल मिळत असतानाही प्रवाशांच्या सोयी-सुविधांकडे रेल्वे दुर्लक्ष करते.
- ऍड. दत्तात्रय गोडबोले, सल्लागार, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संघ
मोदींकडून जनतेची फसवणूक - नवाब मलिक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारने मालवाहतूक दरात साडेसहा तर रेल्वे भाड्यात १४.२ टक्के वाढ करून देशातील महागाईत आणखीनच भर घातली आहे. नरेंद्र मोदींनी जनतेला चांगल्या दिवसाचे आमिष दाखवत चक्क फसवणूक सुरू केली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी रेल्वे भाड्यात झालेल्या भाडेवाढीवर प्रतिक्रिया देताना केली आहे. नवीन सरकारने मालवाहतूक आणि रेल्वे भाड्यात वाढ केल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर तसेच बाजारपेठेवर होणार आहे. त्यामुळे साहजिकच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढून महागाईत आणखी भर पडणार आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेलाच बसणार असून महागाईच्या जात्यात सर्वसामान्य जनता भरडली जाणार आहे असे ते म्हणाले. एकीकडे अदानी, अंबानी यांच्यासारख्या बड्या उद्योगपतींचे हितसंबंध जपायचे आणि दुसरीकडे गोरगरीब जनतेच्या खिशाला कात्री लावायचे धोरण भाजपा सरकारने आखलेले दिसत आहे.