मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) महापालिकेने काही वर्षांपूर्वी विकत घेतलेल्या आठपैकी पाच बुलडोझर न वापरल्याने गंजले आहेत. दुरुस्तीच्या नावाखाली जुने सुटे भाग वापरून नवीन सुट्या भागांची बिले वसूल केली जात आहेत, असा सनसनाटी आरोप म्युनिसिपल कर्मचारी सेनेने केला आहे.
महापालिकेने काही वर्षांपूर्वी घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी आठ बुलडोझर विकत घेतले होते. ते एकाच जागी उभे ठेवून कंत्राटदारांचे बुलडोझर वापरले जात आहेत. आठपैकी अवघे दोन बुलडोझर महापालिका वापरते. पाच बुलडोझर न वापरल्याने गंजले आहेत. गंजलेल्या बुलडोझरचे सुटे भाग काढून वापरात असलेल्या बुलडोझरसाठी वापरले जातात; मात्र दुरुस्तीच्या नावाखाली बिले नव्या सुट्या भागांची लावली जातात, असा आरोप म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष सुनील चिटणीस यांनी केला आहे.