''चाय पे चर्चा'' नामक आगळा वेगळा करियर मार्गदर्शन सेमिनार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 June 2014

''चाय पे चर्चा'' नामक आगळा वेगळा करियर मार्गदर्शन सेमिनार

'मोदि सरकार' च्या यशामागे सर्वात मोठा वाटा होता तो त्यांच्या प्रचार प्रक्रियेचा त्याप्रक्रियेचाच एक यशस्वी भाग म्हणजे ''चाय पे चर्चा'' या ''चाय पे चर्चा'' च्या माध्यमातून मोदी सामान्य जनतेशी संवाद साधून सामान्य जनते पर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले. याच  ''चाय पे चर्चा'' या गीमिकाला प्रेरित होवून आता ''इन्फोमेटीक''  या स्वयंसेवी संस्थेने यंदा दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी  ''चाय पे चर्चा'' 'नामक आगळा वेगळा करियर मार्गदर्शन सेमिनार'  शनिवार (ता.7) जून रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजीत केला आहे. 

या सेमिनारच्या माध्यमातून दहावी नंतर विज्ञान शाखेत करियर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला जाईल. व त्यांना ''विज्ञान'' शाखेतील करियर च्या नवीन आणि वेगवेगळ्या वाटाविषयी मार्गदर्शन करण्यात येईल. हा सेमिनार म्हणजे दहावीच्या मुलांसाठी त्यांच्याच मानसिकतेला हेरून त्यांच्याच भाषेत साधणारा सुसंवाद असणार आहे. विद्यार्थी व पालक चहाच्या सोबतीने या सेमिनारच आनंद मोफत लुटू शकतील. तरीही इच्छुक विद्यार्थी व पालकांनी या सेमिनारच्या पहिल्या वहिल्या प्रयोगात सहभागी होण्यासाठी 9769782552/9870086858/9664789390 या क्रमांकावर संपर्क साधावा प्रवेश मर्यादित असल्यामुळे संपर्क साधून आपली आसने आरक्षित करावीत.     

Post Bottom Ad

JPN NEWS