नालेसफाई केवळ कागदावरच - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नालेसफाई केवळ कागदावरच

Share This
मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comया वर्षी शहर आणि पूर्व उपनगरात नालेसफाईची विदारक स्थिती असून या परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती महापालिकेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी व्यक्त केली आहे. पालिकेची नालेसफाई केवळ कागदावरच आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. 
आंबेरकर यांनी सोमवारी नालेसफाई कामांची पाहणी काही पत्रकारांसह अचानक भेट देऊन केली. त्यांनी चेंबूर, पी. एल. लोखंडे मार्ग, छेडानगर, सोमय्या नाला आदी ठिकाणांची नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. ९0 फूट रस्त्यालगत रफिकनगर नाला तर कचर्‍याच्या ढिगाने व्यापलेला तसेच चेंबूर येथील कादरिया नगर नाला एका बाजूने पूर्णपणे बंद केल्याचे आढळले. तेथे बेकायदेशीर झोपड्या उभ्या राहिल्या असल्याने विरोधी पक्षनेत्यांनी या संदर्भात एम-पश्‍चिम विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांना विचारणा केली असता, त्यांना याविषयी स्पष्टीकरण देता आले नाही. पी. एल. लोखंडे मार्गावरील सुभाष नगर नाल्याचीही दयनीय अवस्था झाली आहे. टिळक नगर येथील सोमय्या नाला हा पूर्व उपनगरातील महत्त्वाचा नाला असून २0 टक्के नालेसफाई झाली नाही. मुकुंद नगर व छेडा नगर येथील नाला अजून साफ झालेला नाही, असे निदर्शनास आले.

येत्या पावसाळ्यात या परिसरात १00 टक्के पूरसदृश परिस्थिती निर्माण होणार आहे. महापौर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासारखे एका जागी थांबून नाल्यांच्या सफाईची किती कामे झाली हे पाहता येत नाही. तर ज्या ठिकाणी नाला सुरू होतो व ज्या ठिकाणी संपतो तेथेपर्यंत नाल्यांची पाहणी करणे गरजेचे आहे, असे आंबेरकर म्हणाले. पालिका प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाचा खरा चेहरा जनतेसमोर आणला आहे, असेही ते म्हणाले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages