ऑनलाइन परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ऑनलाइन परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर

Share This
मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.com) तांत्रिक कारणामुळे चार केंद्रांवर रखडलेली ऑनलाइन परीक्षेची सुधारित तारीख महापालिकेने जाहीर केली आहे. या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक आणि परीक्षा केंद्र पालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर झाले आहे. १७ जून रोजी नवी मुंबईतील सानपाडा येथे ही परीक्षा घेण्यात येणार आहे. बुधवार, १८ जून आणि गुरुवार, १९ जून रोजी मुंबईत आणि २0, २१ आणि २२ जून रोजी ठाणे येथील संबंधित केंद्रावर, त्या केंद्रांवरील उपस्थित परीक्षार्थींची नव्याने ऑनलाइन परीक्षा घेण्यात येईल. परीक्षार्थींचा परीक्षा केंद्र, बॅच क्रमांक, परीक्षेची वेळ महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. प्रवेशपत्र आणि ऑनलाइन परीक्षेसंदर्भात काही अडचणी असल्यास उमेदवारांनी मार्गदर्शनासाठी टोल फ्री क्रमांक १८00१0२२00४ यावर सकाळी १0 ते सायंकाळी सात या वेळेत संपर्क साधावा. तसेच मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावरही माहिती उपलब्ध करून दिली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages