मोनोरेलच्या खांबांवर जाहिराती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मोनोरेलच्या खांबांवर जाहिराती

Share This
मुंबई : सर्वसामान्यांसाठी आकर्षण ठरलेल्या वडाळा-चेंबूर या मार्गिकेवरील विविध संस्था व उत्पादकांना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मोनोरेल खांबांचा व स्थानक परिसरात जाहिरातींचा पर्याय एएमआरडीएने खुला केला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने चेंबूर ते वडाळा या ८.८0 किमी लांबीच्या मोनो मार्गावरील ३५५ खांब आणि सात स्थानके जाहिरातींसाठी उपलब्ध करण्याचे ठरवले असून इच्छुक संस्थांकडून स्वतंत्र प्रस्ताव मागवले आहेत. यामुळे एकूण ५0 हजारहून अधिक चौ.फूट इतकी जागा जाहिरातींसाठी उपलब्ध होऊ शकणार आहे.
मोनोरेलच्या एकूण ३५५ खांबांवर २६३४0 चौ.फूट इतकी जागा जाहिरातींसाठी उपलब्ध होणार असून मोनोरेलची ७ स्थानके आणि त्याखालील ४0 खांबावर २६७00 चौ.फूट इतकी जागा जाहिरातींसाठी उपलब्ध होणार आहे. यामध्ये खांबाप्रमाणेच स्थानक परिसर, कॉकोर्स परिसर, रेलिंग्ज, जिने आणि इतर बाहेरील बाजू जाहिरातींसाठी उपलब्ध असतील. जाहिरातदार डिजिटल डिस्प्ले, ग्लो साईन्स, विनाई रॅपिंग अशा विविध पद्धतीचा वापर करू शकतील, असे प्राधिकरणाचे सहप्रकल्प संचालक जनसंपर्क दिलीप कवठकर यांनी स्पष्ट केले. निवड झालेल्या स्थानक परिसरासाठी जाहिराती आणाव्यात, परिसराची देखभाल करावी, त्याचप्रमाणे मोनो खांबाची देखभाल करावी, सध्या या खांबावर असलेले अनावश्यक पोस्टर्स, पत्रके भित्तीचित्रे इत्यादी काढून टाकावीत आणि जाहिरातींचे अधिकार भाडेपट्टीने व्यावसायिक जाहिरातींसाठी द्यावेत, अशी प्राधिकरणाची अपेक्षा असल्याचे कवठकर यांनी सांगितले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages