पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज

Share This
मुंबई - पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर कोणतीही समस्या उद्‌भवू नये आणि वाहतूक सुरळीत राहावी यासाठी कोकण रेल्वेचे प्रशासन सज्ज झाले आहे. त्यात कोलाड-ठोकूर या रेल्वे स्थानकांदरम्यान सुरक्षेचे विशेष उपाय केले आहेत. 
पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर नेहमीच दरडी कोसळून वाहतूक विस्कळित होते. त्यामुळे ही समस्या उद्‌भवू नये यासाठी रॉक बॉल्टिंग, पावसाचे पाणी साचू नये यासाठी खास उपाय आणि माती कोसळण्याची शक्‍यता असलेल्या ठिकाणी आरसीसी भिंतींचे बांधकाम असे विविध उपाय कोकण रेल्वेने केले आहेत. दहा वर्षांपासून अशी उपाययोजना केली जात असल्याने अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर 24 तास कर्मचारी गस्त घालणार आहेत. कोलाड-ठोकूरदरम्यान सुमारे 700 कर्मचारी त्यासाठी तैनात करण्यात येणार आहेत. धोकादायक ठिकाणांवर जास्त लक्ष देण्यात येणार असून गाड्यांच्या वेगावर मर्यादा घालण्यात येणार आहे. रेल्वेची स्वयंचलित मेंटेनन्स गाडी रात्रभर मार्गावर लक्ष ठेवून असेल. आणीबाणीसाठी सर्व यंत्रणा तयार ठेवण्यात येईल, अशी माहिती कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी दिली.
लोको पायलट, स्टेशन मास्टर आणि फिल्डवरील इतर अधिकाऱ्यांना संपर्कासाठी रेल्वेतर्फे मोबाईल फोन दिले आहेत. लोको पायलट व गार्डकडे वॉकी टॉकी आहे. याशिवाय प्रत्येक स्थानकावर 25 वॅट क्षमतेचे व्हीएचएफ बेस स्टेशन उभारले आहे. यामुळे धावत्या गाडीमधील कर्मचाऱ्यांना एकमेकांशी व स्टेशन मास्तरशी वायरलेसद्वारे संपर्क साधता येईल.
पावसामुळे दृश्‍यमानता कमी होत असल्याने गाडीचा वेग ताशी 40 कि.मी. ठेवावा, असे आदेश लोको पायलटना दिले आहेत. रत्नागिरी आणि वेरना (गोवा) येथे 24 तास अपघात मदत ट्रेन (एक्‍सिडेंट रिलीफ ट्रेन) तयार ठेवण्यात येणार आहे. याशिवाय ऑपरेशन थिएटरची सुविधा असलेली ऍक्‍सीडेंट रिलीफ मेडिकल व्हॅन तयार ठेवण्यात येणार आहे.

कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या पावसाळी वेळापत्रकाद्वारे चालवण्यात येतील. 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीसाठी हे वेळापत्रक आहे.
मडगाव-सीएसटी मांडवी एक्‍सप्रेस सकाळी 8.30. 
सावंतवाडी-दादर राज्यराणी एक्‍स्प्रेस सायंकाळी 5.30.
एर्नाकुलम-निजामुद्दीन मंगला एक्‍स्प्रेस 10.45.
मडगाव-दादर जनशताब्दी एक्‍स्प्रेस 12.10.
मेंगलोर-टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्‍स्प्रेस 12.50.
मडगाव-सीएसटी कोकणकन्या एक्‍स्प्रेस सायंकाळी 4.45.
मडगाव-चंदीगढ गोवा संपर्क क्रांती एक्‍स्प्रेस 12.25.
मडगाव-सीएसटी एक्‍स्प्रेस सायं. 4.45.
मडगाव-हापा एक्‍स्प्रेस सकाळी 7.15.
सावंतवाडी-दिवा पॅसेंजर सकाळी 8.35.
मडगाव-एर्नाकुलम एक्‍स्प्रेस रात्री 9.00.
कारवार-यशवंतपूर एक्‍स्प्रेस दुपारी 2.55.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages