अवैध प्रवास करणार्‍यांकडून दंड वसूल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 June 2014

अवैध प्रवास करणार्‍यांकडून दंड वसूल

मुंबई  / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comआरपीएफने मध्य रेल्वेवर महिलांच्या डब्यांतून प्रवास करणार्‍या पुरुष प्रवाशांप्रमाणेच दलालांविरोधात कडक कारवाई केली आहे. जानेवारी ते मे महिन्यापर्यंत केलेल्या संयुक्त कारवाईत एकूण ५५ लाख रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे. यात सुमारे नऊ हजार अवैध प्रवासी आणि १७६ दलालांविरोधात कारवाई केली आहे.मोटरमनच्या डब्यातून प्रवास करणार्‍या रेल्वे कर्मचार्‍यांनाही दंड ठोठावण्यात आला आहे.
महिलांच्या डब्यांत प्रवास करणार्‍या पुरुष प्रवाशांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी चार महिला अधिकार्‍यांची स्वतंत्र पथके स्थापन करण्यात आली होती. या पथकांनी ९,३१0 प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली, तर २४५ जणांवर पोलिस कारवाई केली आहे. महिलांच्या डब्यांतून प्रवास करणार्‍या १६,७२९ मुलांना डब्यांतून उतरवण्यात आले. या पाच महिन्यांच्या कारवाईतून २९ लाख 0३ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. विविध स्टेशनवरील दलालांविरोधातही मोहीम हाती घेण्यात आली. त्यात १७६ दलालांना अटक करून २६ लाख ६४ हजारांचा दंड आकारण्यात आला. या वेळी दलालांकडून १२७८ तिकिटेही जप्त करण्यात आली आहे. गेल्यावर्षी याच काळात १५९ दलालांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ५४६ तिकिटे जप्त करताना ९ लाख ८२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

Post Bottom Ad

JPN NEWS