मुंबईत ३0 टक्के पाणी कपात ? - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत ३0 टक्के पाणी कपात ?

Share This
मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या जलाशयांमध्ये अजूनही पावसाने दमदार हजेरी लावली नसल्यामुळे सध्याच्या पाणी कपातीत आणखी १0 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. बुधवारी होणार्‍या स्थायी समितीमध्ये बहुधा त्याची घोषणा होईल. मंगळवारी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या जलाशयांत किमान २६ ते ६८ मि.मी. पाऊस पडला आहे, पण तो समाधानकारक नाही. या पावसामुळे सहा जलाशयांतील पाण्याची पातळी व साठा एक मीटरनेही वाढलेला नाही, असे पालिकेच्या एका अधिकार्‍याने सांगितले. ही परिस्थिती लक्षात घेता पाणी कपातीमध्ये आणखी १0 टक्के वाढ करावी लागेल, अशी चिन्हे आहेत. स्थायी समितीमध्ये सध्याच्या पाणी साठय़ा बद्दल प्रशासन निवेदन करणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages