मुंबईत सहा वर्षांत ४६ हजार ६0६ लोकांचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत सहा वर्षांत ४६ हजार ६0६ लोकांचा मृत्यू

Share This
मुंबईत सात हजार ७५ क्षयरोग्यांचा मृत्यू
मुंबई : मुंबईत गेल्या सहा वर्षांत ४६ हजार ६0६ मृत्यू झाला असून, दरवर्षी सरासरी सात हजार ७६७ लोकांचा मृत्यू होतो तर २0१३-१४ मध्ये क्षयरोगाने सात हजार ७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी धक्कादायक माहिती 'प्रजा फाऊंडेशन'च्या 'स्टेट ऑफ हेल्थ ऑफ मुंबई' या अहवालात दिली आहे. मुंबईत खाजगी आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत अत्याधुनिक सुविधा आणि जागतिक दर्जाचे कौशल्य असतानाही क्षयरोगाचे पूर्णपणे निर्मूलन करण्यात पालिकेला अपयश आले आहे. यामुळे मुंबई लवकरच मृत्यूंची राजधानी होईल, अशी भीती 'प्रजा'चे विश्‍वस्त निताई मेहता आणि प्रकल्प संचालक मिलिंद म्हस्के यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली. २0१३ मध्ये ७६५0 मुंबईकरांचा कोणत्याही कारणाविना मृत्यू झाल्याचा आरोपही मेहता यांनी केला. 

'प्रजा'ने दिलेल्या माहितीनुसार, २0१३ मध्ये मुंबईत विविध व्याधींनी झालेले मृत्यू : क्षयरोग- ७0७५, डायरियाने आजारी असलेल्या १.२ लाख रुग्णांपैकी २५५ रुग्ण मृत, कॉलरा- सात, विषमज्वर-१0, डेंग्यू-१0८, हिवताप- १९५. हिवतापामुळे मृत पावलेल्यांचे प्रमाण अधिक असून निदान झालेल्या ९४ रुग्णांपैकी एक या आजारामुळे मरण पावत असल्याचा निष्कर्ष 'प्रजा'ने काढला आहे. २0१४ मध्ये मुंबईत एक हजार ३९३ रुग्ण क्षयरोगाने व ३0 रुग्ण हिवतापाने मृत्युमुखी पडले, अशी माहिती पालिकेनेच दिली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages