जात प्रमाणपत्रासंदर्भातील अडचणी दूर करणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

जात प्रमाणपत्रासंदर्भातील अडचणी दूर करणार

Share This
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये खाटीक समाजाला इतर नावानेही ओळखण्यात येत असल्यामुळे जात प्रमाणपत्र देताना येणार्‍या अडचणी त्वरित दूर करण्यात येतील, असे ठोस आश्‍वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य मुस्लीम खाटीक समाज या संघटनेचे अध्यक्ष व मनसे उपाध्यक्ष हाजी अरफात शेख यांना दिले आहे.
मागास असलेल्या या समाजाचा ओबीसीमध्ये (इतर मागासवर्ग) समावेश करावा, या मागणीसाठी तत्कालीन कामगार मंत्री शाबीर शेख यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन समाजाचे विविध प्रश्न त्यांच्यासमोर मांडले असता, शिवसेना प्रमुखांच्या आदेशावरून युती सरकारने १९९६ मध्ये मुस्लीम खाटीक समाजाचा ओबीसीमध्ये समावेश केला होता. राज्य सरकारने आपल्या शासन निर्णयात मुस्लीम खाटीक असा उल्लेख केला आहे. मात्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये खाटीक समाजाला इतर नावानेही ओळखण्यात येत आहे. मराठीतील खाटीक व्यतिरिक्त अन्य शब्दांची नोंद असलेली कागदपत्रे सादर करणार्‍यांना जात प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत असल्याचे शेख यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages