प्रवाशांच्या सोयीसाठी मरेचा १0 सूत्री कार्यक्रम - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्रवाशांच्या सोयीसाठी मरेचा १0 सूत्री कार्यक्रम

Share This
मध्य रेल्वे प्रशासनाने आपल्या उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना सुखद, आरामदायी आणि सुरक्षित प्रवास देण्यासाठी १0 कलमी कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. हा कार्यक्रम अगदी तातडीने राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रसाधन गृहांच्या स्वच्छतेपासून मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरही काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात येणार आहे.
उपनगरीय रेल्वेच्या मध्य रेल्वे मार्गावरून दररोज सुमारे ३५ लाख प्रवासी प्रवास करतात. मध्य रेल्वेच्या मेन लाईन, हार्बर मार्ग आणि ट्रान्स हार्बर मार्गावर दररोज ११८ लोकलच्या द्वारे १६१८ लोकलच्या फेर्‍या केल्या जातात. आपल्या प्रवाशांना प्रवास करताना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मध्य रेल्वे प्रशासन विशेष १0 कलमी कार्यक्रम राबवणार आहे. यामध्ये रेल्वे स्थानकांची आणि लोकलच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे. मेल-एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्यांचे वेळापत्रक सुधारले जाणार आहे. प्रसाधनगृहांची स्वच्छता राखण्यात येणार आहे. वेटिंग लिस्ट कमी करण्यासाठी जादा कोच लावण्यात येणार आहेत. रेल्वे परिसरात आणि रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांना मिळणार्‍या अन्नपदार्थाचा दर्जा चांगला असण्यावर भर देण्यात येणार आहे. अनारक्षित तिकीट आता एटीव्हीएम मशिन्सवर देण्यात येणार आहेत. शेतकी मालाची वाहतूक करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. रोड ओव्हर ब्रिज आणि रोड अंडर ब्रिजच्या कामाला वेगाने पूर्ण करण्यात येणार आहे. काही ट्रेनच्या रनिंग वेळा कमी करण्यात येणार आहेत. या १0 कलमी कार्यक्रमामुळे मध्य रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळेत नियमितता येण्यास मदत होणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages