करोडपती "लालबागचा राजा"ने पालिकेचा २३ लाखाचा दंड थकवला - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

करोडपती "लालबागचा राजा"ने पालिकेचा २३ लाखाचा दंड थकवला

Share This
लालबागचा राजा पालिकेला मात्र पावला नाही 
मुंबई / अजेयकुमार जाधव / http://jpnnews.webs.com
आमचा गणपती नवसाला पावतो व मुंबई मधील सर्वात श्रीमंत असा आमचा गणपती आहे असे सांगणाऱ्या लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाने मुंबई महानगर पालिकेचा २३ लाख रुपयांचा दंड गेल्या दोन वर्षामध्ये भरलाच नसल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते महेश उर्फ बाळा वेंगुर्लेकर यांनी पालिकेकडून मिळवलेल्या माहिती मधून उघड झाले आहे. नवसाला पावणाऱ्या करोडपती लालबागचा राजा कडे पालिकेला दंड वसुली साठी नवस करावा लागत असला तरी पालिकेला मात्र हा गणपती पावत नसल्याचे दिसत आहे.

मुंबई लालबाग येथील लालबागचा राजा हा सर्वात श्रीमंत असा गणपती म्हणून ओळखला जातो. नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीकडे लोकांच्या रांगा लागलेल्या असतात. आमच्या गणपतीला शेकडो किलो सोने, चांदी आणि करोडो रुपये रोख म्हणून दान दिले जाते असे या गणेशोत्सव मंडळाकडून दरवर्षी सांगितले जाते. अश्या या करोडपती गणेशोत्सव मंडळाकडून गणेशोस्तव साजरा करण्यासाठी पालिकेकडून परवानगी मागितली जाते. भला मोठा असा मंडप उभारला जातो. यासाठी ठिकठिकाणी खड्डे पाडले जातात. सन २०१२ मध्ये या मंडळाने ठीठीकानी एकूण ९५३ खड्डे पाडले होते.  परंतू गणेशोत्सव संपल्यावर रस्त्यावर पदपथावर पाडलेल खड्डे या मंडळाने बुजवलेच नाहीत. 

पालिकेच्या नियमानुसार मंडप काढल्यानंतर रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याची जबाबदारी संबंधित गणेशोत्सव मंडळाची आहे. मंडप बांधण्यासाठी पाडलेले खड्डे बुजवले नाही तर पालिका अश्या मंडळाला दंड आकारते. सन २०१२ मध्ये पालिकेच्या एफ -  दक्षिण विभागाने सार्वजनिक मालमात्त रस्ते पदपथावर खड्डे मारल्याबद्दल लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला २३ लाख ५६ हजार रुपयांचं दंड आकारला आहे. परंतु हा दंड लालबागच्या राजाने अद्याप पालिकेकडे जमा केलेला नाही. अशी माहिती एफ दक्षिण विभागाच्या परिरक्षण विभागाचे सहाय्यक अभियंता म. ल. रायकवाड यांनी दिली आहे. 

लालबागच्या राजाने अद्याप रस्त्यावर पदपथावर पाडलेल्या खड्ड्यांचा दंड भरलेला नाही. पालिकेनेही  अद्याप या मंडळावर कोणतीही कारवाही केलेली नाही. मंडळाकडून दंड वसूल करण्यास पालिकेचा एफ दक्षिण विभाग अपयशी ठरला आहे. करोडपती मंडळ २३ लाखाचा दंड भरत नसल्याने मंडळाकडील दंड वसूल करण्याबाबत कायदेशीर कारवाही करून दंड वसूल करण्यात यावा अशी मागणी एफ दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्तांनी कायदा विभागाला पत्र लिहून केली आहे. यासर्व प्रकारावरून सर्वाना पावणाऱ्या लालबागच्या राजाकडे दंड वसुली साठी पालिकेला गेले दोन वर्षे नवस करावा लागत आहे. तरीही सर्वाना नवसाला पावणारा लालबागचा राजा मात्र पालिकेला पावत नसल्याने पालिकेला दंड वसूल करण्यात अपयश येत आहे.  




Post Bottom Ad

JPN NEWS

Pages