२0१५ पर्यंत प्लॅटफॉर्मची उंची वाढवा - हायकोर्ट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

२0१५ पर्यंत प्लॅटफॉर्मची उंची वाढवा - हायकोर्ट

Share This
प्लॅटफॉर्म आणि लोकलमधील दरी लक्षात घेता मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांतील फ्लॅटफॉर्मची उंची ३१ मार्च २0१५ पर्यंत वाढवा, असे निर्देश उच्च न्यायालयाने रेल्वेस दिले आहेत. रेल्वेने फ्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यास तीन वर्षांचा कालावधी लागेल असे उत्तर दिले. मात्र न्यायालयाने यावर नाराजी दर्शवत प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे म्हणताना निधीची तरतूद करावी असे निर्देश दिले.
घाटकोपर येथे मोनिका मोरे या तरुणीच्या अपघातानंतर फ्लॅटफॉर्म आणि लोकलमधील दरीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यासंबंधी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. रेल्वेने बुधवारी प्रतिज्ञापत्र सादर करून आपली बाजू मांडली.पश्‍चिम रेल्वेवरील १४५ अािण मध्य रेल्वेवरील ७२ स्थानकावरील फ्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यासाठी ९६ कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे रेल्वेच्या वकिलाने न्यायालयास सांगितले. तसेच रेल्वे परिसरात १४ हेलिपॅड अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना उभारण्याचा प्रस्ताव विचारधीन असून यासंबंधी राज्य सरकारला पत्र लिहिल्याचे सांगितले. यामध्ये आझाद मैदान-सीएसटी, माटुंगा जिमखाना-दादर, रेल्वे कॉलनी मैदान-कुर्ला, दादोजी कोंडदेव स्टेडियम-ठाणे, रेल्वे स्कूल-कल्याण, एमआयडीसी-अंबरनाथ, आदर्श विद्या मंदिर-बदलापूर, नंदकुमार इन्स्टिट्यूट-इगतपुरी, पनवेल आणि वायएमसीए मैदान-वसई या ठिकाणी हेलिपॅड उभारण्याचे विचारधीन आहे. ट्राफिक ज्ॉममुळे अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यास विलंब लागतो. त्यावर हेलिपॅड योग्य मार्ग असल्याचे रेल्वेच्या प्रतिनिधींनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages