विद्यार्थ्यांना मारणे योग्य नाहीच - हायकोर्ट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 July 2014

विद्यार्थ्यांना मारणे योग्य नाहीच - हायकोर्ट

मुंबई : विद्यार्थी हा शाळेत शिकायला आलेला असतो. त्याला मारून-मुटकून शिकवणे अथवा पट्टीने मारणे हे योग्य नाही. परदेशात आई-वडिलांनी मारल्याची तक्रार मुलांनी केली, तर पालकांना तुरुंगाची हवा खावी लागते, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. सेंट कोलंबो शाळेतील विद्यार्थिनीला पट्टीने मारणार्‍या मिशेल मार्क शिक्षिकेने आपल्या विरोधातील तक्रार रद्द करावी म्हणून उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने मत व्यक्त करताना याचिकेची सुनावणी गुरुवारी ठेवली आहे.
गावदेवी येथील सेट कोलंबो शाळेतील किंडर गार्डनमध्ये छोटा शिशू वर्गात शिकणार्‍या एका विद्यार्थिनीला मिशेल मार्क अँण्टोनी या महिला शिक्षिकेने मारहाण केली होती. तिच्याविरोधात पोलिसांनी भादंवि कलम ३२४ अन्वये धोकादायक शस्त्राने वार केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. ही तक्रार रद्द करा, अशी याचिका त्यांनी दाखल केली आहे. त्या याचिकेवर न्या. व्ही. एम. कानडे आणि न्या. प्रमोद कोदे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी अँण्टोनी यांच्या वकिलाने शिक्षकेवर केलेले आरोप हे तथ्यहीन असल्याचा दावा केला. पोलिसांनी या विद्यार्थिनीच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रार नोंदवून घेतलेली आहे. तसेच मारण्याच्या घटनेचे पालक हे प्रत्यक्षदश्री साक्षीदार नाहीत. घटना घडल्यानंतर ४८ तासांनंतर तक्रार नोंदवली आहे. शिक्षकेने मारण्यासाठी कोणत्याही धोकादायक हत्याराचा वापर केलेला नाही. कलम ३२४ अन्वये धोकादाय शस्त्राने वापर केल्याचा आरोप होतो. लाकडी फूटपट्टी ही धोकादायक हत्यार नाही, असा दावा करून पोलिसांनी दाखल केलेली तक्रार रद्द करावी, अशी विनंती केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS