रेल्वे घेणार ११,७९0 कोटींचे कर्ज - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेल्वे घेणार ११,७९0 कोटींचे कर्ज

Share This
नवी दिल्ली : २0१४-१५ वर्षासाठी रेल्वे विभाग आपल्या दोन कंपन्या आयआरएफसी आणि रेल विकास निगम र्मयादिततर्फे बाजारातून ११,७९0 कोटी रुपयांचे भांडवली कर्ज घेणार आहे. फेब्रुवारीमध्ये मांडण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात १३८00 कोटींचा अंदाज लावण्यात आला होता. त्या तुलनेत २0१0 कोटींची कपात करण्यात आली. 
रेल्वेमंत्री पी. व्ही. सदानंद गौडा यांनी सांगितल्याप्रमाणे, रेल्वे विभागाच्या भांडवलासाठी अंतर्गत तरतुदी वाढवण्यात आल्याने मी चालू आर्थिक वर्षात बाजारातून घेतल्या जाणार्‍या कर्जामध्ये कपात घोषित करतो. त्यामुळे बाजारातून घेतले जाणारे कर्ज ११,७९0 कोटींवर येऊन ठेपणार आहे. उर्वरित २0१0 कोटींची कमतरता खाजगी, सरकारी भागीदारीतून (पीपीपी) भरून काढली जाणार आहे. रेल्वे अर्थसंकल्पानुसार, भारतीय रेल्वेची वित्तीय शाखा आयआरएफसी ११,५00 कोटी रुपये प्रकल्प आणि इतर गुंतवणुकीसाठी उभारणार आहे, तर उर्वरित २९0 कोटी रुपये रेल विकास निगमतर्फे उभारले जातील. २0१३-१४ वित्तीय वर्षात या दोन्ही कंपन्यांनी एकूण १४,६८८ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages