इंटरनेटच्या सहाय्याने मिळणार प्लॅटफॉर्म, जनरल तिकीट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

इंटरनेटच्या सहाय्याने मिळणार प्लॅटफॉर्म, जनरल तिकीट

Share This
नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक असणार्‍या रेल्वे विभागाला आता आधुनिक रूप मिळणार आहे. रेल्वे प्रवाशांना विनासायास तिकीट काढण्याची सोय रेल्वे मंत्रालयाने उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू केली आहे. यापुढे इंटरनेटच्या सहाय्याने प्लॅटफॉर्म आणि जनरल तिकीट काढता येणार आहे. सोबतच मोबाईल फोन आणि डाकघरांच्या माध्यमातून तिकीट बुकिंग प्रणाली आणखी लोकप्रिय करण्यावर सरकारचा भर असणार आहे. 

रेल्वेमंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी मंगळवारी २0१४-१५ साठीचा रेल्वे अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. या वेळी ते म्हणाले की, इंटरनेटच्या माध्यमातून प्लॅटफॉर्म आणि जनरल तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. येत्या पिढीसाठी ई-तिकीटप्रणाली सुरू करून रेल्वे आरक्षण व्यवस्थेत सुधारणा केली जाईल. ज्यामुळे प्रतिमिनिट २000 तिकिटांऐवजी ७ हजार २00 तिकिटे काढणे शक्य होईल. याशिवाय एकाच वेळी १ लाख २0 हजार उपभोक्ते या ऑनलाइन सुविधेचा लाभ घेऊ शकतील, असे सरकारला वाटते. गौडा पुढे म्हणाले की, कॉईन टाकून तिकीट देणार्‍या ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीनमधील सुविधांचेही लवकरच परीक्षण केले जाईल. प्रवाशांच्या सुविधेसाठी तथा त्यांचा वेळ वाचण्यासाठी पार्किंगसह प्लॅटफॉर्म कांबो तिकीट सुरू करण्याचाही सरकारचा विचार आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकावरील प्रतीक्षालयातही ऑनलाइन तिकीट काढण्याचा पर्याय खुला करून दिला जाईल. दरम्यान, जनतेच्या हितामध्ये सत्ताधार्‍यांचे हित दडले आहे, या कौटिल्य व चाणक्यनीतीवर आधारित हा रेल्वे अर्थसंकल्प आहे, असे गौडा यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages