रायगडमधील समुद्रकिनारी 10 वर्षांत 122 जण बुडाले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रायगडमधील समुद्रकिनारी 10 वर्षांत 122 जण बुडाले

Share This
मुंबई - रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी 2004 ते 2013 या काळात 122 जणांचा बुडून मृत्यू झाला. या दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने जीवरक्षकांची नियुक्ती, धोक्‍याचे फलक लावणे, पोलिस बंदोबस्त अशी उपाययोजना केली आहे. मात्र सर्व किनाऱ्यांवर जीवरक्षक नेमलेले नाहीत, असे राज्य सरकारने विधान परिषदेतील एका उत्तरात मान्य केले आहे. मुरूड येथील समुद्रात मुंबईतील चेंबूर येथील सहा जणांचा रविवारी (ता. 6) बुडून मृत्यू झाला. तिथे जीवरक्षक नेमलेले नाहीत, असे या उत्तरातील माहितीवरून स्पष्ट होते. 
गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधान परिषदेत 10 जूनला प्रश्‍नोत्तराच्या तासात ही माहिती दिली आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, नागाव, बोर्ली, काशिद, मुरूड-जंजिरा, दिवेआगर आणि हरिहरेश्‍वर या समुद्रकिनाऱ्यांवर 10 वर्षांत 122 जणांचा बुडून मृत्यू झाल्याचे गृहमंत्र्यांच्या उत्तरात म्हटले आहे.
दिवेआगर, हरिहरेश्‍वर, काशिद व मुरूड-जंजिरा हे किनारे धोकादायक असल्याचे फलक लावण्यात आले आहेत. काशिद, दिवेआगर आणि हरिहरेश्‍वर येथे जीवरक्षक नेमले आहेत. या चारही ठिकाणी पोलिस बंदोबस्त असतो, असेही सरकारच्या उत्तरात म्हटले आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages