रेल्वे तिकीट बुकिंग अवघ्या 30 सेकंदात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेल्वे तिकीट बुकिंग अवघ्या 30 सेकंदात

Share This
मुंबई - भारतीय रेल्वेने आरक्षणासाठी नवीन संकेतस्थळ लॉंच केले असून, याच्या माध्यमातून आता अवघ्या 30 सेकंदामध्ये तिकीट आरक्षित करणे शक्‍य होत आहे. www.nget.irctc.co.in असे नाव असलेल्या या "नेक्‍स्ट जनरेशन‘ संकेतस्थळामुळे सध्या लागणाऱ्या वेळेच्या तुलनेत चारपट वेगाने तिकीट आरक्षित करता येते. त्यामुळेच ती लोकप्रिय होत आहे. 

या संकेतस्थळाची माहिती देणारा एसएमएस सध्या आयआरसीटीसीच्या विद्यमान युजर्सना येत आहे. विशेष म्हणजे नव्या वेबसाईटच्या माध्यमातून आगोदरच्या संकेतस्थळाच्या तुलनेत जास्त तिकिटे आरक्षित करणेही शक्‍य आहे. पूर्वी पारंपरिक संकेतस्थळाद्वारे दोन हजार तिकिटे आरक्षित करणे शक्‍य होते; पण नव्या संकेतस्थळाच्या माध्यमातून सात हजार तिकिटे आरक्षित करता येतील. यावर एकूण 69 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. 

जुन्या संकेतस्थळावर लॉग इन होण्यापासून ते तिकीट आरक्षित होऊन पैसे भरण्यापर्यंत युजर्सना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. तसेच तत्काळ तिकीट काढताना ते आरक्षित होईपर्यंत तिकिटे संपल्याचा अनुभव येत असे. अनेकदा तर पैसे आकारणी होऊनही तिकीट आरक्षित होत नव्हते. नव्या संकेतस्थळामुळे मात्र पारंपरिक वेबसाईटच्या तुलनेत अधिक जलद गतीने तिकीट आरक्षित होत आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages