मुंबई - सत्यशोधक ओबीसी परिषदेतर्फे "स्वतंत्र भारतात ओबीसी पारतंत्र्यात‘ या विषयावर 18 ऑगस्टला शिवाजी मंदिरात महाचर्चा होणार आहे. ही माहिती परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली. बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
आरक्षणापूर्वी ओबीसींचा सरकारी नोकऱ्यांतील वाटा 12.44 टक्के होता. आरक्षणानंतर आज त्यांचा वाटा 4.4 टक्के कमी झाला आहे. 16 लाख ओबीसी कर्मचारी बढतीच्या प्रतीक्षेत आहेत. ओबीसींचे नेतृत्व करणारे 64 आमदार गप्प आहेत, असे उपरे म्हणाले. 23 ऑगस्टपासून दोन दिवस पुण्यात सत्यशोधक ओबीसी परिषदेची बैठक होणार आहे. त्यात महत्त्वाचे निर्णय होतील, असे ते म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राजकीय लाभ उठवण्यासाठी राज्य सरकारने मराठा व मुस्लिम समाजाला राज्यघटनेविरोधात आरक्षण दिले आहे. हे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, असा दावा त्यांनी केला.