१.७३ लाख फुकट्या प्रवाशांकडून ७.८५ कोटी दंड वसूली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

१.७३ लाख फुकट्या प्रवाशांकडून ७.८५ कोटी दंड वसूली

Share This
मुंबई - पश्चिम रेल्वेने जून महिन्यात विना तिकीट व अनियमित तिकीट प्रवाशांविरोधात केलेल्या कारवाईमध्ये १.७३ लाख प्रवाशांकडून ७.८५ कोटी रुपयांचा दंड वसूल केला. गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत ही रक्कम ३१.३९ टक्के जास्त आहे. आरक्षित केलेले तिकीट दुसऱयांना देण्याची १७७ प्रकरणे पकडण्यात आली त्यामध्ये २.१४ लाख रुपये वसूल करण्यात आले. १२८३ भिकारी, अनधिकृत फेरीवाल्यांना पकडण्यात आले व त्यापैकी ९६ जणांना तुरुंगात पाठवण्यात आले. महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱया १७५ कुमारवयीन मुलांना त्या डब्यातून उतरवण्यात आले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages