मुंबई - राज्य शासनाने १०४ क्रमांकावर कॉल केल्यास त्वरित रक्त पुरवठा करण्याची योजना सुरु केली आहे. याच धर्तीवर १०४ क्रमांकाची ‘ब्लड ऑन कॉल’ योजना मुंबई महानगर पालिकेत राबविली जाण्याचा विचार करण्यात येत आहे. आरोग्य समितीच्या झालेल्या सोमवारी झालेल्या बैठकीत याबबात चर्चा करण्यात आली. १०४ क्रमांकाची ‘ब्लड ऑन कॉल’ योजना कशी राबवायची याबाबतचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. योजना राबवताना येणार्या अडचणी टाळण्यासाठी काय उपाययोजना करायच्या याबाबतची चाचपणी सुरू आहे. या योजनेमुळे कोणाचाही जीव रक्त मिळाले नाही म्हणून दगावणार नाही. या योजनेमुळे अनेकांचे प्राण वाचतील, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.
Post Top Ad
08 July 2014
Home
Unlabelled
पालिकेतही ‘ब्लड ऑन कॉल’ योजना राबविली जाणार
पालिकेतही ‘ब्लड ऑन कॉल’ योजना राबविली जाणार
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

