‘एमबीबीएस’च्या 640 जागा महाराष्ट्राला पुन्हा मिळणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

‘एमबीबीएस’च्या 640 जागा महाराष्ट्राला पुन्हा मिळणार

Share This
mci_scam4_630
राज्य शासनाच्या गलथान कारभारामुळे गमावलेल्या एमबीबीएसच्या हक्काच्या 640 जागा महाराष्ट्राला पुन्हा मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. या बाबतचा आदेश दिल्लीतून आज संध्याकाळपर्यंत निघण्याची शक्यता आहे.
वैद्यकीय शिक्षण घेणाऱया विद्यार्थांना पायाभूत सुविधा मिळत नसल्याच्या कारणावरून केंद्र सरकारच्या मेडिकल कौंसिल ऑफ इंडियाने महाराष्ट्रातल्या 640 जागा रद्द केल्या होत्या. त्या परत मिळविण्यासाठी राज्य शासनाच्या एका हमीपत्राची आवश्यकता होती. मात्र, या संदर्भातल्या महत्वाच्या बैठकीला राज्याच्या आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव मनिषा म्हैसकर यांनी दांडी मारल्याने या जागा महाराष्ट्राच्या हातून निसटल्या होत्या. आता पायाभूत सुविधा पुरविण्याच्या अटींवर या जागा महाराष्ट्राला पुन्हा मिळणार आहेत

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages