अर्ध्याहून अधिक इराकवर इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (आयएसआयएल) या दहशतवादी संघटनेने कब्जा केला आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागांतील शहरांमध्ये जणू दहशतवादी भरतीची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने मुंबई पोलिसांना दिली आहे. पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या ऍंटी टेरेरिझम सेलला पत्र लिहून सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
रात्रीच्यावेळी जिहादच्या नावाखाली तरूणांची माथी भडकविण्याचे काम सुरू असल्याची माहिती मारिया यांना मिळाली आहे. तसेच आखाती देशात जे नागरिक जात आहेत, त्यांची कसून तपासणी आणि चौकशी करण्याचे आदेश मारिया यांनी दिली आहे.
सप्टेंबर 2012 मध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यात अण्टी टेरेरिझम सेलची (एटीसी) स्थापना करण्यात आली आहे. या सेलमध्ये एक पोलीस निरिक्षक चार कर्मचारी तैनात असून, शहरातील विविध ठिकाणी सुरु असलेल्या अवैध कारभारांवर हे पथक बारीक लक्ष देऊन असते. त्याचप्रमाणे संशयास्पद दहशतवाद्यांवर देखील यांची करडी नजर असते. त्याअनुशंगाने या पथकाना सतर्कतेचे आदेश देण्यांत आले आहेत.
इराकमध्ये आयएसआयएल या दहशतवादी संघटनेने बंडाळी करीत, खुलेआम रक्तपात सुरु केला आहे. इराकमधील जवळपास निम्म्याहून अधिक शहरावर कब्जा केला आहे. यामुळे या नेक कामाकरिता आणखी जिहादी तरूणांची आवश्यकता असल्याने, संपुर्ण जगातून अशा जिहादी तरूणांची भरती करण्याचे आदेश आयएसआयएलचा म्होरक्या अबु बक अल-बगदादीने दिले आहेत. त्यानुसार संपूर्ण जगात असलेल्या अल्पसंख्याक तरूणांची माथी जिहादच्या नावावर भडकाविण्याचे काम सुरु झाले आहे. याची सुरुवात मुंबई शहरात देखील झाल्याची माहिती गुप्तहेर संघटनाना मिळताच, त्यानी तात्काळ मुंबई आणि राज्यातील जिल्हा प्रमुखाना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
मालेगांव, पुणे, औरंगाबाद आणि कोकण विभागांवर अधिक लक्ष मुंबईसह आयएसआयएलने मालेगांव, पुणे, आाwरंगाबाद आणि कोकण विभागांवर लक्ष देण्यास सुरुवांत केली आहे. येथील गरीब तरूणांना पैशाचे मोठे अमिष दाखवून, तसेच जिहादच्या नावाने त्यांचे ब्रेन वॉश करुन, मोठय़ा प्रमाणात भरती करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे देशाच्या सीमांवर देखील कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
