म्हाडाच्या कार्यालयातील दलालांचा सुळसुळाट, म्हाडाच्या लाचखोर अधिकाऱयांनाच अटक यासारख्या घटनांमुळे म्हाडाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून म्हाडा कार्यालयात आाता सीसीटीव्ही पॅमेऱयांची नजर असणार आहे. लवकरच म्हाडाच्या कार्यालयात सीसीटीव्ही पॅमेरे बसविण्यात येणार आहेत. जुलै अखेरपर्यंत म्हाडाच्या प्रवेशद्वारावर, परिसरात आणि कार्यालयाच्या प्रत्येक मजल्यावर असे एकूण 80 च्या आसपास सीसीटीव्ही पॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
हायटेक यंत्रणा, उच्च दर्जाचे छायाचित्रण, नाईट व्हीजन मोड, आयपी ऍड्रेस, मुव्हमेंट पॅप्चर अशा अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण हे सीसीटीव्ही पॅमेरे आहेत. सध्या म्हाडा कार्यालयात 52 सीसीटीव्ही पॅमेरे असून हे पॅमेरे मोजक्याच मजल्यांवर आहेत. पण जुलै अखेरपर्यंत म्हाडा प्रवेशद्वार, परिसर, कार्यालयाच्या प्रत्येक मजल्यावर सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.
यातील चार पॅमेरे हे 360 अंशाच्या कोनात फिरतील. यामुळे म्हाडाच्या आवारातील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवता येईल. प्रत्येक पॅमेऱयाला एक आयपी ऍड्रेस देण्यात आला आहे. या आयपी ऍड्रेसच्या आधारे अधिकारी त्यांच्या संगणकातून किंवा अगदी मोबाईलमधूनही सीसीटीव्हीचे चित्रण बघू शकतील. म्हाडाच्या कार्यालयात एखादी गाडी 5 मिनिटांपेक्षा अधिक वेळ उभी राहिली किंवा एखादी संशयास्पद हालचाल दिसली तर सीसीटीव्ही पॅमेऱयांची यंत्रणा सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाला याबाबत संदेश देईल. हे पॅमेरे उच्च दर्जाचे असल्याने रात्रीही सुस्पष्ट चित्रीकरण दिसेल. सुरक्षा रक्षकांसाठी आणि काही मुख्य अधिकाऱयांच्या कार्यालयात एलसीडी क्रीनची व्यवस्था करण्यात येईल.
