रेल्वे आरक्षणात अधिकारी, आयआरसीटीसीचे साटेलोटे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेल्वे आरक्षणात अधिकारी, आयआरसीटीसीचे साटेलोटे

Share This
मुंबई - आरक्षणात रेल्वे अधिकारी आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग ऍण्ड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनमध्ये साटेलोटे आहे. त्यामुळे या व्यवहाराची रेल्वे बोर्ड किंवा सीबीआयने चौकशी करावी, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी सोमवारी केली. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वेची आरक्षित तिकिटे मिळत नसल्यामुळे आपण या प्रकाराची चौकशी केली तेव्हा ही धक्‍कादायक माहिती समोर आली. तत्काळ आरक्षणाच्या नावावर कोकण रेल्वेच्या सर्व गाड्यांचे उत्तरेतील राज्यांतून आरक्षण झाल्याचे दिसले. उत्तर प्रदेश, बिहार, आसाम आणि पश्‍चिम बंगालमधून हे आरक्षण झाल्याचे त्यांनी सांगितले. कोकणातील सर्व गाड्या भरण्याइतकी बिहार आणि असाममध्ये राणे-तावडे नावाच्या लोकांची संख्या आली कुठून, असा सवाल करून या प्रकाराची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी आपण रेल्वे मंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिष्टमंडळ मंगळवारी नवी दिल्लीत रेल्वे आणि कृषी मंत्र्यांची भेट घेणार आहे. स्वामिनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करणे, कांदा व अन्य शेती उत्पादनांचे किमान आधारभूत दर ठरविणे, पीक वीमा योजनेचा आढावा घेणे आदी मागण्या कृषीमंत्र्यांकडे करण्यात येणार असल्याची माहिती तावडे यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages