मुंबई - जन्म दाखल्याची दुय्यम प्रत देण्यासाठी 1200 रुपयांची लाच घेणाऱ्या महापालिकेच्या भांडुप येथील आरोग्य कार्यालयातील राजू लिंगप्पा कांबळे याला एसीबीच्या पथकाने अटक केली. भांडुपमधील रहिवाशाने मुलाच्या जन्म दाखल्यासाठी सप्टेंबरमध्ये अर्ज केला होता. मात्र, तेथील अधिकाऱ्याने जन्म दाखल्यासंबंधीचे कागदपत्र मुख्यालयात गेल्याचे सांगून राजू कांबळेची ओळख करून दिली. त्याने या दाखल्यासाठी बाराशे रुपयांची मागणी केली. याची त्याने एसीबीकडे तक्रार करताच सोमवारी सकाळी प्रभाग कार्यालयात लाच घेताना कांबळेला अटक केली.
Post Top Ad
01 July 2014
Home
Unlabelled
जन्म दाखल्यासाठी लाच घेणारा अटकेत
जन्म दाखल्यासाठी लाच घेणारा अटकेत
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

