टाटा पॉवरविरोधात बेस्टचे प्रतिज्ञापत्र - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

टाटा पॉवरविरोधात बेस्टचे प्रतिज्ञापत्र

Share This
मुंबई - टाटा पॉवरचे वीज वितरण परवान्याचे नूतनीकरण करू नये, यासाठी बेस्ट विद्युत पुरवठा उपक्रमाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी बेस्ट उपक्रमाने राज्य वीज नियामक आयोगाकडे पुरवणी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. 
येत्या 15 ऑगस्टला टाटा पॉवरचा मुंबईतील वीज वितरणाचा परवाना संपुष्टात येत आहे. परवान्याच्या नूतनीकरणाची प्रक्रिया सुरू झाली असतानाच बेस्टने राज्य वीज नियामक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यासाठी बेस्टने 2011 सालच्या अपिलीय लवादाच्या निकालाचा आधार घेतला आहे. नोईडा पॉवर कंपनीविरुद्ध पश्‍चिमांचल विद्युत वितरण निगम या प्रकरणातील निर्णयाकडे बेस्टने आयोगाचे लक्ष वेधले आहे. वीज कायद्यानुसार दुसऱ्यांदा परवाना मिळताना विशिष्ट टप्प्यामध्ये वितरण यंत्रणा विकसित करता येत नाही. ती आधीच्या परवान्याच्या वेळीच विकसित करायला हवी, असे बेस्टने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

सध्या टाटा पॉवरची मुंबई शहरात वीज वितरणासाठी कोणतीही यंत्रणा नाही. टाटा पॉवरचे मुंबई उपनगरामध्ये वीज ग्राहक असताना गेल्या पाच वर्षांमध्ये कंपनीला वीज वितरण यंत्रणा विकसित करण्यात अपयश आले आहे, असे स्पष्ट करीत बेस्टने टाटाविरुद्ध वीज कायदा 2003 अनुच्छेद 42 चा आधार घेतला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages