मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन

Share This
मुंबई : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा जलदगतीने व्हावा, यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात ७ जुलै २0१४ रोजी लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मुंबई शहर जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अडचणी व तक्रारीसंबंधी ज्या नागरिकांना आपली निवेदने लोकशाही दिनी सादर करावयाची आहेत त्यांनी जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांच्या नावे विहित नमुन्यात अर्ज करावा. जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांच्या कार्यालयात अर्जाचा विहित नमूना सूचना फलकावर लावलेला आहे. विहित नमुन्यातील अर्ज व सोबत अर्जाची आगाऊ प्रत जोडून लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी पाठवणे आवश्यक आहे. अर्जदाराने लोकशाही दिनाच्या दिवशी मूळ अर्जासोबत उपस्थित राहावे. वरील बाबींची पूतर्ता केली नाही तर लोकशाही दिनात प्रत्यक्ष अर्ज सादर करता येणार नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनी संबंधित नागरिकांनी उपस्थित राहून दोन प्रतींमध्ये आपली निवेदने जिल्हाधिकारी यांना सादर करावीत. अन्य व्यक्तीमार्फत पाठवलेली निवेदने स्वीकारली जाणार नाहीत. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages