इमारतीची गच्ची कोसळल्यामुळे घरे रिकामी करण्याची नोटीस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 July 2014

इमारतीची गच्ची कोसळल्यामुळे घरे रिकामी करण्याची नोटीस

मुंबई - घाटकोपरमधील तीनमजली जवेरी सदन इमारतीच्या गच्चीचा भाग कोसळल्यामुळे ती रिकामी करण्याची नोटीस महापालिकेने रहिवाशांना पाठवली आहे. पावसाळ्यापूर्वी ही इमारत धोकादायक म्हणून घोषित केली नव्हती. 
घाटकोपर पश्‍चिम लक्ष्मी-नारायणनगरमध्ये बाई जवेरबाई ट्रस्टच्या जुन्या इमारती आहेत. त्यातील जवेरी सदनच्या तिसऱ्या मजल्याचा स्लॅब आणि गच्चीचा भाग कोसळला. यात कोणालाही दुखापत झाली नसली, तरी महापालिकेने ती धोकादायक ठरवून तत्काळ रिकामी करण्याची नोटीस पाठवल्याचे सहायक आयुक्त विजय कांबळे यांनी सांगितले. या इमारतीत 28 घरे आहेत. त्यातील काही रिकामी होती. ही खासगी इमारत असल्याने रहिवाशांनाच पर्यायी घराची सोय करावी लागेल. 

पावसाळ्यात धोकादायक इमारती पडण्याच्या घटना घडतात. त्यामुळे मे महिन्यातच महापालिकेने धोकादायक इमारतीतील रहिवाशांना नोटिसा पाठवल्या होत्या. आयुक्त सीताराम कुंटे यांनी स्वत: पाहणी करून त्या रिकाम्या करण्याचे आवाहन रहिवाशांना केले होते; मात्र त्यातील अनेक इमारती अद्याप रिकाम्या झालेल्या नाहीत. 

Post Bottom Ad

JPN NEWS